खुणा

विझल्यात खुणाही सरल्या गाथा उरले गीत व्रणांचे
आकाशी तुटल्या तार्‍यांचे खेद कुणाला आता
स्वेद ओघळे भाळावरती पाउल पुढचे पडता
आग निवळण्याआधी भडके परतुन जाता जाता

भंगुरतेचे स्वप्न अनोखे रेखिव घडले लेणे
अभंग त्याचे गुणगुणतांना शिरी वाहिले मेणे
गोत विखुरले शब्दस्वरांतुन गोत्र एक ते विरघळले
पात्र किनारे विस्तारुन अवघ्यांचे सागर झाले

.......................अज्ञात
७/१२/२०११