निरांजनात रक्त

बोचरे खिळे

आणि हवा गेलेले आयुष्य
वेगात गाडी
आणि सदऱ्यावर शिंतोडे
वाकडी वळणे
आणि शिखरावर कावळे
हिरवी पाने
आणि पिवळी पुस्तके
दारिद्र्य भोवती
आणि चिल्लर,  ढीगारे 
मनुष्य नागडे
आणि देव मढलेले
निरांजनात रक्त
आणि वेदनेचा घमघमाट
आपलीच फांदी
आणि कुऱ्हाडीचा दांडा
कर्जांची कमळे
आणि सामांन्याचे भुंगे