संभ्रम

संभ्रम आयुष्य असे का माझे
न सरते पुढे, रमते फक्त मागे
 माझ्याच  प्रश्नांची हि उत्तरे
पर मजला गवसत नाही

स्वप्नांचे हे उंच उंच मनोरे
रचतो आणि मोडतो स्वप्नांमध्ये
ह्या परिस्थितीचे कारण शोधत आहे
पण नियती साथ देतच नाही

घुबडा सारखे कायम एकटेच जगणे
कोणी आहे याची चाहूल कायम वाटत राहणे
या एकटेपणाला साथ शोधत आहे
पण प्रेमाचा हाथ हातात येत नाही

नव्या आशेची पालवी रोज सकाळी
अंधारलेली रात्र मात्र कुश्याशी अखेरी
या दिवसांचे रूप पालटत नाही
नवीन पहाट काही उगवत नाही

अपेक्षा न ठेवता जे होईल ते पाहणे
वस्तुस्थितीचे हेच कायम उत्तर आहे
ह्या सर्वाला माझाही पर्याय नाही
परमेश्वराचे हृदय का पालटत नाही