दान

पुण्य लाभते अन्नदानाने
ते क्षणैक रे
तृप्ती लाभते विद्यादानाने
अनंत जन्म रे बाबा..
भुपती होसी भुदानाने
सोन्याने झळकसी रे
शितल होसी चंदनदानाने
उदकदाने सदा सुखी रे बाबा
सुंदर होसी वस्त्रदानाने
दानशुर वसे ऊंचावरी रे
सर्वश्रेष्ठ ठरसी अभयदानाने
कृपादान करसी रे बाबा
जीवनदेसी रोग निवारुनी
अमूल्यसेवा ही रे
गरीब, गरजूना साभाळिशी
महान कार्य रे बाबा
ह्या साऱ्यांच्या पुढचा विचार
तुच करिशी रे
आहेच आमुचा विश्वास
माऊलीचे रुप रे बाबा