आकाशलक्षी

चंद्रिका आकाशलक्षी; कूस छाया पावली
त्या प्रभाती, नांदणार्‍या; जागल्या अन चाहुली
मंद वारा गंधमंडित छंदला गात्रांतुनी
धुंदल्या हृदयी; स्वरांच्या; आर्द्र ओल्या मैफिली

तेच गाणे ते उखाणे पापण्यांची सावली
सुप्तशा वर्मास छेडे, गोत, हलक्या पाउली
डोहजळकुंभात फुलल्या; तलम कोमल कमलिनी
आर्त रात्रीचे विखुरले, स्वप्न भरले लोचनी

.......................अज्ञात