दूर कुठेतरी एक कडा
आकाशी घुसलेला
कृष्णमेघ लपेटुनि अंगी
ध्यानस्थ दिसे बसलेला
व्रत घेऊनि वैराग्याचे
विचारमंथन चाले त्याचे
तो न पाही हिरवळीला
तो न पाही बहराला
उतारावरील गावामधुनी
चैतन्याचे दिवे चमकती
अंगावरुनी ओहोळ वाहती
दुधाळ सात्विक भाव उमटती
एकरूप तो 'त्याच्याशी'
त्यास नाही व्यवहार गती
वासनामय जगताची
नसे त्यास पर्वा क्षीती
(पूर्व प्रकाशन; मीमराठीं. नेट/नोड/४३१४)