आशेचा हबका

ते चोर होते की दरोडेखोर

बांधती फडके चेहऱ्यावरी
अन 
विश्वासावरच चालवती सुरी 
ते दलाल होते की सावकार
नसे नितीमत्ता तसेच
ढासळलेली वैचारिक पातळी
माज बुद्धीचा
अन 
राजरोस वाटमारी
आशा कुठेतरी अजुनही जागृत
पाजेल निदान कोरडे शब्दामृत
ना लावेलआशेचे वेंटिलेटर
जरी का असेच रुग्ण मृत
असह्य आता होणे आजारी
यमाचे गोंजारणेही 
गुदगुल्या करी
चित्रगुप्ताच्या साट्यालोट्यात 
आता लाचार धन्वंतरी