बाजार

सत्य बाजारी  उभे
भाव मिळण्या धडपडे
असत्याची गिऱ्हाईके सारी
सत्यापायी सारे भिकारी

लक्तरांची दाटी झाली
सत्याची होरपळ झाली
असत्य मिरवे शालूमधुनी
सत्यास सारखे नागवूनी

जीव जीवासी मारी
असत्याला शिरी धरी
अजुनी सत्य भीक मागे
गिऱ्हाईक येई न पुढे