" नेते आले भेटीला"
जो तो सांगे ज्याला त्याला ।
नेते आले हो भेटीला।२॥ध्रु॥
परीट घडीची वस्त्रे घालूनी ।
फिरे घरोघरी ते अनवाणी ॥
नमन करीती सर्वा वाकूनी ।,
टिळा लावूनी कपाळाला ।१॥ध्रु॥
पांच वर्षे ना दिसले कोठे ।
नांव मोठे लक्षण खोटे ॥
बघण्या त्यांना गर्दी लोटे।,
दूरुनी न्याहाळी मुखचंद्राला।२॥ध्रु॥
मतदारांनो उठा आता ।
निवडा तुम्ही तुमचा नेता ॥
महत्त्व आहे तुमच्या मता ।,
निवडून द्या हो सज्जनाला ।३॥ध्रु॥
अनंत खोंडे.
१२।१।२०१२.