क्षणिक आठवण
का भावना
चेतवती संवेदना
देती मनाला
ह्या वेदना
तृषार्त मी
मृगजळामागे धावतो
तुझ्या आठवणीने
चांदण्यात होरपळतो
छळती मज
उपवनातील झुले
आक्रंदण्यास कमी
आकाश खुले
आठवणीच्या वादळात
होलपटलो कैकवेळा
उन्मळून पडलो
झुळुक आली तेव्हा
विसरु नकोस
सजेल मेंदी जेव्हा
क्षणिक आठ्वणिने
भिजेल पापणी तेंव्हा
राजेंद्र देवी