लोढणे पतंगा

अलगतेचा विस्मय दंगा

चालणे अगम्य अंताकडे
मांजाचे लोढणे पतंगा
निलाजरा वेताळ नंगा
भुतलावर हेलपाटा
धारदार पळवाटा
भीषण फुत्कार
राक्षसी हास्य धुवांधार
बोचलेला विखारी काटा
अनपेक्षित नातलग लाटा
विच्छिन्न संचार
रेती निवृत्त निराकार
पिवळ्या पानांच्या वाकुल्या
दात दाखविणारे कावळे
मांजरांची आडवी निरागसता
आणि तरीही सफ़लता