बाभळीची लावणी...

तोऱ्यात उभी बांधाशी नखरेल बाभळी अशी ।
की नवतरणी ती कुणी सुकुमार कोवळी जशी ॥

ती नक्षी फुलांची पिवळ्या शालूवर हिरव्या कंच ।
कमनिय अशी अंगानं, मुसमुसली नार ती टंच ।

जरी गंध नसे हो तिला प्राजक्त-मोगऱ्याचा ।
काटेरी अदा गुलजार घेई ठाव काळजाचा ।।

ती खुळी बाभळी अशी अवतरली यौवनात ।
खाक जळुनिया हो झाले किती गुलाब ते मनात ॥