सुखाच्या ह्या ऋतूत
तुम्हाला हवे म्हणून-
माझ्याजवळचे
पाने फुले फळे आणि फांद्याचे
सर्वस्व देण्यासाठी-
मला जगावेच लागेल !
दु:खाच्या त्या ऋतूत
तुम्हाला हवे म्हणून-
कुणाच्या तरी
जगण्यासाठी
चुलीत जळण्यासाठी-
कुणाच्या तरी
मरणानंतर
चिता जाळण्यासाठी-
माझे अचेतन खोड
मला जपावेच लागेल !