आचके विचारांचे

उत्तुंग यशानंतरही

प्रचंड थकवा
ध्येय गाठण्यासाठी
लागतो चकवा
नव्या पायरीवरी
रोज नवा पाय
प्रत्येक पावलास
ना माहीत, पुढे काय?
भावना ही जिंकल्याची
की सर्व संपल्याची
खुणावतात वासना
मन सांगते, आता बास ना
मीच काय, माझी कविताही
आता धीर सोडते
आचके विचारांचे
राखेतल्या विचारांचे