एकला

एकला

अथांग दर्यावर चांदण्या सांडल्या
वेचावया तयांना चंद्र खाली आला
कोवळ्या किरणात रविकिरणे सांडली
सावरण्या तयांना भास्कर झेपावला

तृषार्त झाल्या लतावेली मेघराज बरसला
झुलविण्यास फळाफुलांना मंद वारा जो आला
अथांग या जगतात वाटा अनेक फुटल्या
सोबत आहे कोणी कोणाला मार्ग माझा मी एकला

राजेंद्र देवी