निरभ्र आभाळात
निरभ्र आभाळात
जेव्हा काळे ढग जमतात
आसमंत काळवंडून जातो
काळे ढग
जेव्हा वाऱ्यासंगे झुंजतात
पाऊस कोसळून जातो
आभाळाचे उर फाटते
धरणी माय हिरवी होतो
शालू नेसून नटते सजते
आभाळ मात्र कोरडे असते
काळे आभाळ निळे बनून
नदी-नाल्यातून वाहते
ढगांचा कडकडात
गीत बनून गाते