मी रडण्यासाठी नाही जन्माला आलो...!!

मी सूर लावूनी  मस्त जगत गेलो  
मी रडण्यासाठी नाही जन्माला  आलो  
मी दुख पाहिले तरीही नाही खचलो 
मी शांतपणे दुखही भोगित गेलो 
मी होतो कोठे..? नि आलो आता कोठे ..?
का  मी उगाच वणवण फिरलो ...?
हे दुख किती नि सुख किती आले गेले ...
ना हिशेब केले की नाही मोजीत बसलो
हरणे,जिंकून जाणे  मी गौण समजलो  
खोटा डाव कधी ना मी खेळत बसलो  
दुख कधी मी कुरवाळीत नाही बसलो 
दुखाला दूर लोटुनी मी पाउल टाकीत गेलो 
मी भणग होऊन आलो मी अनवाणीही फिरलो 
मी कंदील घेउनी फिरलो , नि स्वप्ने शोधीत बसलो   
जमेल तसे मी आनंदाचे रतिब टाकीत गेलो
दुःख जराशे ,सुख जराशे मी सुर लावित गेलो