"सोवळा नेता"
नेता माझा दिसे सोवळा ।
"अंगी त्याच्या हो नाना कळा"२॥ध्रु॥
नेता राहे मुंबापुरी ।
रोज खाई अंडाकरी ॥
" सागर काठी डुले, झिंगूनी खुळा"२॥ध्रु॥१॥
भोजनात सदा रंगतो ।
पार्टीत सदा डोलतो ॥
" बारबाला संगे झुले, होई बावळा"२।ध्रु॥२॥
जिथे जातो तेथे खातो ।
भ्रष्ट पैसा गोळा करतो ॥
"परदेशी नेऊन ठेवी, पैसा सगळा"२॥ध्रु॥३॥
अनंत खोंडे.
५।२।२०१२.