वणवा

एक वणवा भडकवायचा होता,
सारे अपवित्र जाळण्यासाठी ...

फक्त एकाच ठिणगीचा अवकाश होता

बघता बघता सारे जळणार होते.....

आता वणवा भडकलाय

नि बघता बघता विझतही चाललाय

पण आताशा भीती वाटू लागलीय

कारण पवित्रही जळू लागलय......