अवेळ

अवेळ

येऊ घातली साठी
मज हवी आता काठी
वाकला हा देह
आयुष्याचे ओझे पाठी

संपला तो काळ
संपली ति वेळ
वार्धक्याचा हा खेळ
कोणतीही वेळ अवेळ

राजेंद्र देवी