मी..

विरघळलेल्या नीलमचा वाहता हा क्षण
निळं निळं असं शांत मन
ना कुठे जमीन ना आसमंत कुठे
ना सळसळणारी फांद्या पाने
म्हणता आहेत फक्त तू आहेस इथे
फक्त मी आहे
मनाची खोली, माझा एकांत
माझी स्पंदने आणि माझा श्वास 
आणि मी.. फक्त मी
झाला मला माझ्या अस्तित्वावर विश्वास

(जावेद अख्तर यांच्या कवितेचं भाषांतर)
 
प्रसाद पासे