खेटू नकोस तू

भलत्याच लाडात खेटू नकोस तू

वाह्यात आज मन भेटू नकोस तू
फेकून ये बंधने मन्मनात तू
संकोच आता लपेटू नकोस तू
तू गोड वावटळ झपाटून टाक तू
मीठीत सारे समेटू नकोस तू
हा खेळ आता जुना जाहला सखे
ऊगा मलाही घसेटू नकोस तू
होतील आत्ताच ही शांत वादळे
नौकेस पाण्यात रेटू नकोस तू
 
वणव्यास नाहीच त्याची दिशा कळे
भलत्याच भानात पेटू नकोस तू