दिसू लागला

चंद्र नभाचा  धरेवरी  मज दिसू लागला
भास ही तुझा तुझ्यासारखा दिसू लागला

वाऱ्याने भडकविल्या ज्वाळा रात्रीच्या अन
स्वप्नांचा मधुमास वितळता दिसू लागला

हजार कल्लोळांच्या संगे बागडला जो
एकांताच्या कुशीत शिरता दिसू लागला

दुःख - वेदनांची ही कसली विचित्र नाती
परका अपुला अपुला परका दिसू लागला