अनुकरण

     दोन तीन दिवसापूर्वीच सातारा जिल्ह्यातील औन्ध गावात शिंदे नावाच्या गृहस्थाने आपल्या मुलीने परजातीय मुलाशी लग्न केल्याबद्दल तिची निर्घृण हत्या केली या घटनेचे पडसाद माध्यमातून व समाजातून मोठ्या प्रमाणावर उठणे स्वाभाविकच आहे.आय बी एन लोकमत वाहिनीवरील या चर्चेत गायकवाड या समाजाच्या नेतृत्व करणाया गृहस्थानी ही मराठा समाजाची शोकान्तिका आहे असे मान्य केले  मात्र हिंदू धर्म हा ब्राह्मणी धर्म असल्यामुळे हे असे घडले असे त्याचे समर्थनही केले.एकाच आठवड्यापूर्वी कॅप्टन भाउराव खडताळे यांनीही लोकसत्ता दैनिकात मराठा समाज जातिबाह्य विवाह करण्यास कचरतात त्याचे कारण ब्राह्मण केवळ ब्राह्मणांशीच लग्न करतात व त्याचे ते अनुकरण करतात असे मत मांडले आहे.
     ब्राह्मणांचे अनुकरणच करायचे असेल तर ज्या औंधात हा भयानक प्रकार घडला तेथीलच राजकन्येने जातिबाह्य विवाह केला होता किंवा इंदिरा गांधी,वत्सलाबाई नाईक अशा अनेक ब्राह्मण समाजातील व्यक्तींची उदाहरणे  अनुकरणीय का समजत नाही ? केलेल्या चांगल्या गोष्टी  अमान्यच करायच्या व काही अनिष्ट प्रथांचे खापर मात्र  फोडायचे या पद्धतीने स्वत:ची प्रगती होते अशा समजुतीत समाज आहे का?

(संपादित : प्रशासक)