रसरसून सुगंध
अंगप्रत्यंगात कोंबलेला
होती एक पाकळी
कमीच त्या फुलाला
वासनेची झालर तयार
सदैव देठ खुडायला
तशात एक भृंग
आला मुक्कामाला
भृंग ऊडोनिया गेला
जाता जाता
काही परागकण
लपेटून गेला
काळे वर्तुळ ऊमटले
डोळ्यांच्या कडेला
डाग पांढरे झळकले
पाकळीच्या चेहऱ्याला
जीव नकोसा झाला
त्या अपंग फुलाला
तेव्हढ्यात बातमी आली
कोंब फुटले परागकणाला
दोन दिसांचे आयुष्य हे
थारा ना दोषाद्वेषाला
विसरू नका रे
मनसोक्त सुगंध वाटायाला
एक पाकळी कमी दिली
विधात्याने मला
सुगंधाच्या माझ्या जगात
आमंत्रण माझे त्या विधात्याला.