जातीच जाळू

मेंदूत पेटत्या वातीच माळू

वातीत सर्व त्या जातीच जाळू
पायास गुंफल्या बेड्याच तोडू
काळोख प्यायली नातीच टाळू
धर्मात त्या जगाया जन्म माझा
बेशिस्त जोखडे का मीच पाळू?
लोण्यात माखले कित्येक मुडदे
सोडेच ना कुणा, हा नीच काळू (कावळे)
मी माळले मणी छोटे व मोठे
भेदास लागलो हा मीच टाळू