नारी शक्ती
नारी शक्ती तुजला वंदन ।
आज दिनी पुन्हा आर्वजून॥ध्रु॥
तुच माता तुच भगिनी ।
तुच भार्या तुच भामिनी ॥
देवही करिती तुझे स्तवन॥ध्रु॥१॥
संस्काराची असे तू मुर्ती ।
संसाराला नेशी पुढती ॥
मुला बाळांचे करी संगोपन॥ध्रु॥२॥
तुझ्याविना संसार अधुरा ।
मान वाढता होईल पुरा॥
घ्या सारे हे आता समजून ॥ध्रु॥३॥
अनंत खोंडे.
९।३।२०१२.