सातवे पाउल

सातवे पाऊल

श्वासात तुझ्या
दंगलो मी
उच्छवासात रंगलो

सहवासात तुझ्या
झिंगलो मी
थांबलीस स्वप्न भंगलो

प्रसंगी पचविले
भात्यातले बाण मी
ना नात्यातले वाग्बाण

प्रसंगी पचविला
मी कोलाहल
ना तुझे मौन

प्रसंगी पचविले
मी हलाहल
ना तुझे सातवे पाऊल

राजेंद्र देवी