सांडले ह्रदय

गंमत म्हणून तीने झटकली 

जराशी वस्त्रे भरजरी
गुलाबी रुमालातून सांडले
हृ्दय जमिनीवरी
दारातुनच प्रवेशली स्वप्ने 
कोनाड्यातल्या तस्वीरीवरी
अस्वस्थ मन रेंगाळते
तीच्या खिडकीवरी
ती चालते डौलात 
नवख्या पायवाटेवरी
मी ऊभा बंबाळ, 
कुंपणाच्या तारेवरी
ती स्वतःच होती
मधाचे पोळे जरी
नजर तरी 
माझ्या हातातल्या फुलावरी