त्यागून राक्षस
सत्यात आला बिभीषण
पक्षांतरणाचे हेच
ते बीजारोपण
बंधुत्वाचीच शिकवण
रामाची जगाला
आदर्श झाला बिभीषण
राम नाम सत्य जो तो विसरला
सत्तेसाठी भावालाही
सोडू नका
सेतुवरचे गब्बर बॅनर
तोडू नका
अचंबित आता सारे जण
कोण राम अन कोण रावण
हनुमानाची हाताचे घडी
जनतेचा झाला कुंभकर्ण
पुनित भुमीवर
सारेच बिभीषण
गिळंकृत अयोध्येचे सिंहासन
सत्ता हेच एकमेव धोरण
**
नामसाधर्म्य केवळ आजच्या स्वार्थी
राजकारणावर टीकेसाठी.
भावना दुखावणे हा हेतू नाही.