नाते ना ते राहिले

द्रोणातून सारे टुण्ण गुरू ढोसत होते

अंगठेबहाद्दूर शिष्य सारे झिंगत होते
दिवसा कपातून पिणारे रात्री ग्लासात होते
रात्रीच्या थिरक त्या वारुळात 
अनेक वाल्या डोलत होते
एक तीळ सातांनी खाणे मान्य नव्हते
एकट्या शबरीने 
सारी बोरे चाखणे कोणा मान्य नव्हते
पोराच्या हितासाठी काहीही शक्य होते
कैकेयीच्या निर्णयाला
थवे मातांचे वंदत होते
आप्त आप्तांच्या जीवावर ऊठले होते
मांडीस परशुरामाच्या
अनेक कर्ण दंशत होते
कर्तव्यापुढे सारे आंधळे होते
दिव्यत्वाने धृतराष्ट्रास दृष्टी आणणे शक्य होते
दूर्योधनासाठी पट्टी सोडणे सुसंगत नव्हते
...
गुंताच कल्पनांचा मग विकृती
सत्य घटनांची परिणीती
चमत्कृतीत होते.
....
*गावातील शाळेत एका शिक्षक बाईच्या
डोक्यातील ऊवा तीन विद्यार्थिनी काढत
होत्या.
........ ‌सत्यघटना.
विषण्ण कवी काय करू शकतो... विनोदच ना....॥