माझा कं चूकला..

नवरा माझा येतो ऊशीरा घरा

दाराशीच माझ्या सदा लागल्या नजरा
ऐकतो, कुन्या बाई नादी त्यो लागला जरा
घरा आल्या अल्या आला दारूचा भपकारा
तरीपन मीनी ईचारला,
"दोन घास खाता का जरा"
केस ओरले त्यनं माझे फराफरा
ढकलला भींतीवरी मना लागला कोपरा
हलदीचा रंग माझा लाल झाला सारा
भरला ताट त्याने फेकला दारा
शेवटाला तीथंच तो ओकला सारा
..... ‌सांग माझे आये माझा कं चूकला?
आजवर आये याला तूनी संभालला
चंगला वलन तूनी का नाही लवला?
तूनी त्येला आधी का नाही विचारला
हाये का रं बाबा कोनी प्रेमिका तुला?
तुझा अडानी पोरगा खोटा बोलला
माझ्या शिक्शनाचा समदा वाटोला लवला
सांग माझे आये, कंला मना ह्या खड्ड्यान लोटला?
सांग माझे आये, माझा कं चूकला?
कुनी कं सांगल त्या मी करतो
सुखानं ठेवायचा त्येला, मी प्रयत्न करतो
मी फसलो, मना सगला समजतो
आजही आये तो तुझाच ऐकतो
बकोच्या नादी लागू नको , तुच संगतो
सांग माझे आये, तुला कं मिलाला?
सांग माझे आये, माझा कं चूकला?
(काही वर्षांनंतर)
मजुरी करून मी रेटतो संसारा
अता शालेनं जाया लगली दोही पोरा
ह्या संसाराच्या धोतऱ्याचा बघ व्हईल मोगरा
आता जरा बरा वागतो माझा नवरा
तंवऱ्यान तू त्याला करंटा बोलतो
आन गून सारे दुसऱ्याचे गातो
रागातच त्यो जातो खेलाया जुगारा
अगं माझे आये, कं बोलू मी
गप ऱ्हा की जरा, नको करू घोटाला
सांग माझे आये, माझा कं चूकला
माझा पन आये, काई आसल चूकला
पन खरा सांगतो, मी मुद्दाम कई ना केला
तु पन आये, आता करू नको काम
नाव देवाचा तु घे बसल्या बसल्या
पोराच्या सुखात, तु मान गो सुख
नको कान देऊ, गोष्टी खोट्या गावातल्या
आये मी करतोच जमंल तवरा
बघ मीनी आनल्या तुझ्या दम्याच्या गोल्या
आता तु दम खा माझे आये
डोकां जरा तु शांत ठेव माझे आये
सांग माझे आये,तु मानशील का मना आपला
सांग माझे आये, ह्यो जमंल का तुला
                       ह्यो जमंल का तुला?