आला माणूस आडवा

गंधर्वाला मोहायला 

फुले मोहाला आली
दारू पीला माणूस, फुले कचाकचा चेचली
चिंचेचीच कळी एक 
बघता बघता गाभुळली
आला माणूस, त्याने एका दगडात पाडली
एक थेंब पाण्याचा
झाडे नव्हाळून गेली
ऊभा माणुस पाण्यात, धार गढुळून वाहिली
एक झुळुक वाऱ्याची
पाने शहारून गेली
आला माणूस आडवा, गेली झाकोळून झळाळी
सारी हिरवी पाने
भर ऊन्हात तापली
बसला माणूस खाली, झाली सावली सावळी