तो बैल रडतच होता आज
पापणीखाली अश्रू ओघळले आज
एव्हढा मोठा बैल रडतो
कोठे गेला माज
अन राजबिंडा माज
का हा वेडा अश्रू ढाळतो?
हंबरण्यातही वेदना दाटली आज
वेसणीत श्वास गुदमरतो
कानी गुंजतो चाबकाचा आवाज
पावलोपावली अडखळतो
ठेचकाळतो
पण म्हणतही नाही पाणी पाज
ना त्याच्यासाठी तो रडतो
माझ्यासाठीच त्याची नजर ओलावली आज
नजरेने तो हेच सांगतो
मला अन तुला माणुसच मारतो आज
मी तर जनावरातच मोडतो
पण ढोर-मेहनत तुझी अन वाटली लाज
रोज तुझी ही अवस्था बघतो
बघ,
टचकन डोळ्यात पाणी आले आज