भ्रमातल्या जगात या
का धरावे वास्तवाला
जे न भावे कधी मनाला
जे न दिसे कधी जगाला
बेगडी जीवनाला आता
लाभला खोटा किनारा
व्यर्थ सगळे भाव भोळे
उलगडले हे सत्य आगळे
घेउनी पाना फुलांना
का कुठे दिसतो निवारा
घट्ट हात हातात धरूनी
वाट कापणे आता मिळोनी
तू जरी जाशी उडोनी
मी कसा पाहीन स्वप्नी
रंगात रंग रंगवूनी
चित्र ठेविले तुझे जपूनी
सत्य आता एक उरले
प्रेम माझे स्तब्ध झाले
तू दिलेली गोड वचने
हाती फक्त तयासी जपणे