मिळाला मोका तर
सोडणार नाही
सद्गुणी स्वताला
ठरवणार आम्ही
करताना पापे
डगमगणार नाही
पुण्यवान स्वताला
म्हणवणार आम्ही
जिथे जाऊ तेथे
खात राहू आम्ही
तरीही भुकेने
तोंड वासु आम्ही
अशी आमुची ही
जरी भ्रष्ट वृत्ती
न देऊ तियेला
कधी मूठमाती
प्रतिमा अशी ही
जरी डागाळलेली
ताठ मान करुनी
मिरवू जगामधुनी
(पूर्व प्रकाशनः मीमराठी . नेट/नोड/५१५१)