नग्न असते सत्य

सरुनी गेली रात्र कालची

नाही सावली ऊद्याची
सदैवच, खरा तो हाच क्षण
आहे हीच वेळ ती सत्य
ईश्वर म्हणजे सत-आचरण
परमात्मा , हे निर्भेळ सत्य
धर्म, सर्वसमावेशक सत्य
ऊथळ सौंदर्य
इतके सहज नाही सत्य
प्रदर्शनाची जरुर नाही
कारण नग्न असते सत्य
खोट्या चेहऱ्यावरील हास्याच्या
आरस्पानी जगात
सत्य ऊठून दिसते
मेंढरांच्या कळपाला
मार्ग दाखविणाऱ्या
राखणीच्या
श्वानाप्रमाणे