'ग्रेसफुल' ग्रेस!

कवी ग्रेस गेले. विदर्भाच्या मुगुटातला आणखी एक हिरा निखळला. विदर्भाची माती इतकी सकस की अशी हिरे, माणके जन्माला घातली. कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी झुंजत असतानाही त्यांना ही जाणीव होती की आपल्याला अजून खूप लिहायचे आहे. देवाने अजून २/३ महिने तरी आयुष्य द्यावे. पण 'आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना' हेच खरे. 'दुर्बोधतेचा' शिक्का त्यांच्या कपाळी मारला गेला होता. एका अर्थी हे खरेही होते. विद्वान माणसांचे असेच होते. कारण त्यांचा व्यासंग इतका मोठा असतो की खूप विद्वत्ताप्रचुर शब्द ते सहज लिहून जातात पण सामान्य माणूस मात्र त्याचे रसग्रहण करू शकत नाही. त्यांची कविता गूढ वाटायची. तरीही त्यात खूप खोल असे काहीतरी दुःख जाणवायचे. आपले दुःख सोबत घेऊन हा मनस्वी कवी अनंताच्या प्रवासाला निघून गेला. या 'ग्रेसफुल' 'माणकाला' माझे कोटी कोटी प्रणाम!