पोसतो मी

दुष्ट ह्या अफवाच पोसतो मी

विश्व तूझे पायपोस तो मी
का दिला मजला दगा प्रिये तू
पाप तूझे, मात्र सोसतो मी
शब्द खोटे ऐकलेस ते तू
ह्या जगाला आज कोसतो मी
आज नाईलाज जाहला हा
दूर ऊभा पाच कोस तो मी
वार हा पाठीत खोल झाला
कपट हे प्याल्यात ढोसतो मी