निवडणुका आणि भ्रष्टाचार आणि काळा पैसा

आज काल रोज येणाऱ्या बातम्या वाचल्या की त्यात बऱ्याचशा भ्रष्टाचारा संबंधी असतात. भ्रष्टाचार झाला की करणारा पैसे मिळवतो. अर्थात ते दाखविता येत नसल्यामुळे तो काळा पैसा होतो. त्यामुळे जेथे तो खर्च होतो तेथे तो दाखविता येणार नसल्यामुळे  त्यातील बराच पैसा निवडणुकीतच  खर्च केला जातो. आता प्रश्नन असा पडतो  की आपल्याकडे लोकशाही आहे व आपण त्यात लोकावर दबाव येऊ नये म्हणून गुप्त मतदान पद्धती स्वीकारली आहे असे असताना कार्यकर्त्यावर खर्च झाला तर तो निवडणुक आयोगाला द्यावा लागेल म्हणून बहुधा त्यासाठीच निवडणुकीत पैसे वाटले जातात (मतासाठी) पण मग शंका येते ती लोक पैसे घेतल्यावर आपल्याला मत देतील असे उमेदवाराला खात्री कशी वाटते? याला २चं शक्यता दिसतात १ लोक पैशाशी प्रामाणिक राहतात अगर त्यांना उमेदवार किंवा त्याची माणसे गुप्त मतदान असले तरी त्यांना मत कोणाला दिले ते समजू शकते याची ग्वाही देऊ शकत असले पाहिजेत.  म्हणून वाटते या प्रकारात बरीच सुधारणा कारायला हवी.