आपापली समज

हातात फक्त आता 

तुझी काळी तसबीर
त्यावरील पांढरे डाग
आणि काही तडे 
जुळवताना त्यांना मात्र
चेहरेच चेहरे दिसले
काही तुझे काही त्यांचे
माझे चेहरे हरवले का ? 
का तुला चोरावेसे वाटले ?
पदराखाली लपवावेसे वाटले ? 
मुग्ध तू मुग्ध भाव
मुग्ध तुझे नाव गाव
तसबिरीच्या भोवताली जणू 
जत्रेतली स्वस्त जादू 
फोटो बदलताना मधला
तू लपंडाव मांडला
मी कधी केलाच नाही
हट्ट तुझ्या अस्तित्वाचा 
तुझे नसणे तुझे असणे 
सर्व जणू कूट वागणे 
कोण तो हसतो पाहावे
कोण तो सांगतो पाहावे
कोण आहे कोण भासे 
कोण तो सत्यात आहे 
की हा निराळा डाग केवळ
अस्तित्वाचा फेस निव्वळ
कुंकरोनी मी तयाला 
माझीच प्रतिमा पाहू कशाला ?