कोवळी कल्पना आत्ताच तापाळलेली
सर्व गात्रेच संतापात वाफाळलेली
वाट जी मी चाललो भारलेली गुलाबी
पावलोपावली ती रक्त बंबाळलेली
धाडसाने मी कधी बोललोच नाही
आकृती ही जरा अव्यक्त बंडाळलेली
एकदा मी म्हणालो प्रेम आहे ग माझे
ह्या विचारात सारी रात्र स्वप्नाळलेली
बाबती मांडल्या मी शेकडो हारलेल्या
हाय, प्रत्येक साधी गोष्ट शंकाळलेली