फ़िकट चेहरे

जे चेहरे फिकट वाटले

आता कसे निकट वाटले
बोलायचे तिच्याशी मला
जे नेहमी बिकट वाटले
मी हासलो जरी कोवळे
लोकांस ते विकट वाटले
मी जोडले नवे सोबती
हे वागणे चिकट वाटले
लवचिकपणा नको तेव्हढा
कोणास हे चिवट वाटले
आवाज केव्हढा आर्जवी
हे आप्त आदी, नट वाटले