....वाटले

जे चेहरे ओशट वाटले

लाचार की गुळमट वाटले
ते टाळतोय सदासर्वदा
सारे तरी लोचट वाटले
केल्याच मी रोज मशागती 
ते रोपटे रोगट वाटले
आहेच मी झंपक बावळा
नातलगही खुळचट वाटले
तीने दिला होकार मजला
सारेच हे बोथट वाटले
नावेच ठेवे घरट्यास ती
मोठे तरी खोपट वाटले 
मी बोललो सत्य नको तिथे
जे बोलणे तिरसट वाटले 
मुद्यांस सरसकटच वगळले
संवाद ते कोमट वाटले