जिंकलो मी सत्ता जरी, जाणार कोठे?
चूकलो मी रस्ता असा, जाणार कोठे?
वाटते भीती देहदानाची मला का?
माहिती ना मेल्यावरी, जाणार कोठे?
स्वप्नकारंजी विस्कटाया लागली ती
वेदना कुरवाळून मी , जाणार कोठे?
गुप्तगोष्टी कित्येक उलगडतील आता
हृदय माझे घेऊन मी, जाणार कोठे?
तप्त शृंगारानेच नटले तोंड माझे
लाजही ना माझ्यासवे, जाणार कोठे?
चामडी माझी जाड गेंड्याचीच आहे
मोडलेल्या शिंगासवे, जाणार कोठे?
नेत्र माझे विस्फारले मेल्यावरीही
चित्र तीचे माझ्यासवे, जाणार कोठे?