कुत्र्याचे भांडणं
एकदा दोन अल्सेशियन कुत्रे,
भांडताना पाहिले ।
निमित्त होते फक्त एक,
हाडूक त्यांना दिसले॥
एकमेकांचे अंगावर ते,
सतत धावतहोते ।
पुन्हा पुन्हा मागे होऊन,
चवताळून जात होते ॥
दोघांनाही ते हाडूक भांडताना,
सांपडत नव्हते ।
जाणारे येणारे लोक हा,
तमाशा पाहतं होते॥
बऱ्याच जनांनी प्रयत्न केला ,
हे भांडण संपवावे।
कोणालाही न जुमानता ते,
एकमेकावर धावे॥
एका इसमाने मग एक युक्ती केली,
आणला ब्रेड ।
दोघांनीही तो पाहिला नी,
विसरले ते तेढ ॥
शेपटी हालवतं हालवतं ते,
एकत्र पुन्हा आली।
लोकांची तो तमाशा पाहून मात्र,
खूप करमणूक झाली॥
आताशा आपुल्या राजकारणात,
असेच चित्र पाहवयास मिळते।
सत्ताधारी नि विरोधक यांच्यात ,
" भांडण्याचे नुसते सोंग असते२॥"
अनंत खोंडे
२५\४\२०१२.
।
,