मृगजळ

मृगजळ

नाही दिसता तू मज
होते मी कावरीबावरी
नकळत ओघळती
दोन थेंब गालावरी

कुठवर लाउन बसू डोळे
सत्य की भास न कळे
हेलकावते नाव हि
आठवणीच्या मृगजळे

राजेंद्र देवी