आई ग,
खर सांग न मला,
बाप्पा गेला चोरीला,
का बाप्पा निघून गेला?
डोके नाही दुखत,
बाम नको मला,
मी नाही झोपत,
खरंच सांग मला.
आई ग,
आत्महत्या म्हणजे काय ग?
शेतकरी करतात तीच का ग?
तेच पिकवतात धान्य,
तेच उपाशी का ग?
शेतीप्रधान देश म्हणजे काय ग?
मग प्रधान शेती का नाही करत ग?
सरकार म्हणजे मोठा राक्षस का ग?
तो आंधळा आणि खादाड असतो ना ग?
तो झोपलेल्या लोकांना अचानक मारतो ना ग?
अण्णा आणि रामदेवबाबा हिरो न ग?
त्यांना तो राक्षस का छळतो ग?
महागाई दुष्ट बाई आहे का ग?
ती रोज रोज कशी वाढते ग?
हवालदार मामाकडे बंदूक का नाही ग?
त्यांचे चिलखत लुटुपुटूंचे असते का ग?
पोलीस अन सैनिक शूर असतात न ग?
रोज जंगलात का मरतात ग?
आपण प्रॉमिस पाळतो न ग?
मग तेलंगाना का देत नाहीत ग?
रोज किती किती लोक मरून जातात न ग?
देव बाप्पा वरून पाहून कंटाळला का ग?
अमीर खान म्हणतो तसे आल इज वेल नाही न ग ?
म्हणूनच बाप्पा निघून गेले का ग ?
डॉ मकरंद जामकर