अण्णा

अण्णा,
 गुमान बसा,
 उगीच सोडलीत,
 जरा रम ढोसा!!
 जरा रम ढोसा!!
 जीवाची वणवण,
 उगाच भणभण,
 फुकाच उपोषण,
 देशा मनोरंजन,
 वंदे मातरम!
 वंदे मातरम!
 मराल उपाशी,
 फुकट जीवनाशी,
 पिकल खसखसी,
 दिल्ली दारी बत्तीशी,
 वरून मेदान्ताची चौकशी
 अन बातमी कशी?
 माकडतोंड्या गांधी,
 गेला आकाशी!!!
 शतकांची गुलामगिरी,
 गेले इग्रज,
 आता भ्रष्टाचारी,
 रक्तात  भिनली चिरीमिरी,
 नका करू हाराकिरी,
 अण्णा,
 नका करू हाराकिरी!!!
 कशासाठी कोणासाठी,
 सोसतात चेष्ठा,
 सहाल किती हालअपेष्टा,
 उरली का कुठे देशनिष्ठा?
 हात जोडतो अण्णा,
 जरा गुमान बसा,
 उगीच सोडलीत,
 जरा रम ढोसा,
 जरा रम ढोसा
डॉ. मकरंद जामकर