"नेत्यांचे कौतुक"
या नेत्यांनी कौतुक केले।
" योजनांचे पैसे लाटले"२।।ध्रु॥
ठेकेदारा धरूनी हाती।
हप्तेसारे बांधून घेती॥
न देता त्या" वेठी ध्ररीले"२॥ध्रु॥१॥
लाल दिव्याच्या गाडीसाठी।
घेती सारे भेटीगाठी॥
लाच देवूनी "वरती चढले"२॥ध्रु॥२॥
मंत्रिपदी ते विराज होता।
न दिसे त्यांना गरीब जनता॥
कोट्याधिश ते "सारे बनले"२॥ध्रु॥३॥
अनंत खोंडे.
२९।४।२०१२.